Friday, May 28, 2010

विडंबनकाव्य

याचे वाजवाच बारा.
(एका तरुणीची आपल्या बापाकडे मुलाने छेड काढल्याबद्दलची तक्रार)
ती- बाबा कालचीच रात येत होते मी मुकाट आला आडवा रस्त्यात वाट सोडना,
मेला मवाली हा असा झाला होता वेडापिसा हात धरला माझा असा कळ जाईना
त्याला ढकलून बाजूला मी धावत घरी आले घडले जे जे सर्वकाही तुम्हाला सांगितले
याची नजर नाही बरी मस्ती याची जिरवा सारी याला धरून चांगला चोपा हाणा ना----
याची खोड मोडा पुरी याचे वाजवाच बारा....
त्याचे मित्र- अहो अस काय करता बदाबदा मारता अस काय करता कानफाड फोड़ता सुजली याची पाठ सारी
हाताची बी हाड मोडली पायाची बी मोडली आता पुरे करा हाणामारी
ती- खुळ्यावाणी ध्यान याच उभ असता भर चौकात ठार येड़ येत पुढ छेड काढतो चारचौघात
येता मुली शीळ घाली भीड़भाड़ ना याला कुणाची माग येई माझ्या बाई लाज नाही जनाची मनाची
हा लफंगा आहे पक्का दिसतो साधा भोळा तरण्याताठया पोरींवरती असतो याचा डोळा
गाढवावरती उलटा बसवून आणि हातपाय बांधून याची धिंड गावामधी काढ़ा ना....

1 comment:

  1. mitra svatachi creations post kar re ithe!!
    Hasya-rang madhle vidamban kaay dhaptos

    ReplyDelete